“…म्हणून मी रिॲक्ट झालो नाही”, कुणाल कामरा प्रकरणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
विनोदी कलाकार कुणाल कामराच्या विडंबनगीतामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान झाल्याचा दावा करत शिंदे समर्थकांनी हॅबिटॅट स्टुडिओची नासधूस केली. शिंदे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत कामराच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ते म्हणाले, "मी आरोपांवर कामाने उत्तर देतो. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, त्याचा गैरफायदा घेतला जातोय."