दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी; उच्च न्यायालयाचा निर्णय
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. दिशा हिने आत्महत्या केली नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली, असा आरोप करून तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.