शिवसेनेच्या सहा खासदारांना उद्धव ठाकरेंचा व्हीप लागू होणार? उज्ज्वल निकम काय म्हणाले?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फूट पडल्याच्या बातम्या येत आहेत. उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला सहा खासदार अनुपस्थित होते. ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याची मागणी केली आहे. जर हे खासदार उद्धव ठाकरेंच्या पक्षात असतील तर त्यांना उद्धव ठाकरेंचा व्हिप लागू होईल. पण जर ते दुसऱ्या पक्षात गेले असतील तर व्हिप लागू होणार नाही.