सविस्तर: दुष्काळाच्या फायद्या-तोट्याचे गणित
पावसाने दडी मारल्याने राज्यातील शेतीचे यंदा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिके करपली. पावसाची आवश्यकता असताना गेल्या महिनाभरापासून मराठवाडा व अन्य भागांमध्ये पाऊसच झालेला नाही. परिस्थिती भीषण होण्याची शक्यता लक्षात घेऊनच ३० सप्टेंबरपूर्वीच राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्र्यांनी शिवारात नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी दौरे सुरू केले.