एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…
विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळूनही कमी जागा मिळाल्याचा दावा करणाऱ्या शरद पवारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे यांनी विचारलं की, "तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का?" त्यांनी विरोधी पक्षाच्या दुटप्पीपणावर टीका केली आणि विकासकामे सुरू करण्याचं आव्हान दिलं. शिंदे म्हणाले की, महायुतीचं काम जनतेने पाहिलं असून, विरोधी पक्षाला रडगाणं थांबवून काम करावं लागेल.