पाकिस्तानी नागरिकांवरून राज्य सरकारमध्ये समन्वयाचा आभाव? शिंदे-फडणवीसांची विरोधी वक्तव्ये
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांवरून महायुती सरकारमध्ये मतभेद दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचे म्हटले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नसल्याचे स्पष्ट केले. सर्व पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची व्यवस्था झाली असून, ते संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत राज्य सोडतील असे फडणवीस यांनी सांगितले.