एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची अपडेट! डॉक्टरांनी दिली सविस्तर माहिती!
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना ताप, सर्दी आणि घशाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती डॉ. आर. एम. पार्टे यांनी दिली. शिंदे दोन दिवसांच्या विश्रांतीसाठी साताऱ्यातील दरे गावी गेले होते. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्यावर उपचार सुरू असून लवकरच ते बरे होतील. उद्या ते मुंबईला परतणार आहेत.