रुग्णालयातून बाहेर पडताच एकनाथ शिंदेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
महाराष्ट्र सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते. तपासणीनंतर त्यांची प्रकृती सुधारली असून ते मुंबईतील वर्षा निवासस्थानी रवाना झाले आहेत. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीतील धावपळीमुळे त्यांना विश्रांतीची गरज होती. आता ते पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.