फक्त ‘या’ महिलांनाच करता येणार लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना ई-केवायसी करण्याकरता ३१ मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदत केवळ चुका दुरुस्त करण्याकरता आहे. नव्याने केवायसी करण्याची मुदत संपली आहे. या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जाते. ई-केवायसी प्रक्रियेत अडचणी आल्याने ही मुदत वाढवण्यात आली आहे.