प्रशांत महासागरात ‘एल निनो’ची तीव्रता वाढली; प्रथमच समुद्रपृष्ठाचे तापमान ३० अंशांवर
मुंबई : देशात मोसमी पावसाचा हंगाम संपला असून पुढील काही दिवसात संपूर्ण देशातून पाऊस माघारी जाण्याची चिन्हे आहेत. तसेच बहुतांश प्रदेशात उकड्यातही वाढ झाली आहे. दरम्यान, हवामान नोंदीनुसार, इतिहासात प्रथमच विषुववृत्तीय मध्य प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्ससिअसच्या वर गेले आहे. जे सरासरी तापमानाहून ३.४ अंश सेल्सिअसने अधिक आहे. यंदा हिवाळ्याच्या दिवसात ही स्थिती आणखी तीव्र होईल, असा अंदाज जगभरातील हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.