कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झालेल्या तरुणीच्या आईसाठी कंपनीच्या अध्यक्षांचं पत्र
अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीत काम करणाऱ्या सनदी लेखाकार ॲना सेबॅस्टियन यांच्या कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला कार्यालयातील कोणीही उपस्थित नसल्याने ॲनाच्या आईने संताप व्यक्त केला. कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी माफी मागितली आणि ॲनाच्या कुटुंबाला संवेदना व्यक्त केल्या. केंद्रीय कामगार मंत्रालयाने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.