काजू कतलीमध्ये स्टेपलरची पिन सापडल्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध मिठाईवाल्याचा परवाना निलंबित
मुंबईतील तिवारी ब्रदर्स मिठाईवाला दुकानातील काजू कतलीत गंजलेली स्टेपलर पिन आढळल्याने ग्राहक प्रणोय पालव यांनी तक्रार केली. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दुकानाची तपासणी करून परवाना निलंबित केला. तपासणीदरम्यान स्वच्छतेच्या त्रुटी आढळल्या. पालव यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, लोकांनी खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.