“सिया गोयलने १४ जूनलाही केला होता केतनच्या हत्येचा प्रयत्न” नेमकं काय घडलं होतं?
सिया गोयलने तिचा होणारा नवरा केतन अग्रवालला लोहगडावरून ढकलून हत्या केली. १८ जूनला सियाने केतनला ढकलल्याने तो ४०० फूट दरीत पडला. सियाने बनाव रचून केतनचा पाय घसरल्याचे सांगितले, परंतु तपासानंतर हत्या असल्याचे स्पष्ट झाले. सियाने तिच्या प्रियकर चेतन चौधरीसोबत कट रचला होता. पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.