‘मी खरं सांगितलं असतं तर आमचं सरकारच आलं नसतं’, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार म्हणाले..
अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत सांगितले की, या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येत आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना पैशांचे सोंग करता येणार नाही, हे सांगितले होते. अजित पवार म्हणाले की, आम्ही साधू-संत नाही, आमचे व्हिजन आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्याचे उत्पन्न वाढवून मार्ग काढू. कोणतीही योजना बंद करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.