सुनेत्रा पवारांच्या गाडीतील शासकीय चालकाला उतरवून अनिकेत तटकरेंनी चालवलं वाहन
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चिपळूणातील सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी गेल्या होत्या. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं, ज्यामुळे टीकेची झोड उठली आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर, शासकीय प्रोटोकॉल मोडल्याबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. शासकीय वाहन चालवताना शासकीय चालक असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.