चार हजार लाडक्या बहिणींनी माघार घेतल्यानंतर आदिती तटकरे म्हणाल्या, “सरकारी तिजोरी…”
राज्यभरातील चार हजारांहून अधिक महिलांनी 'लाडकी बहीण' योजनेतून वगळण्यासाठी अर्ज केले आहेत. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपात्र ठरल्यास लाभाची रक्कम दंडासहित वसूल होण्याच्या भीतीने हे अर्ज आले आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, काही महिलांनी लाभ परत दिला आहे आणि अर्ज छाननी प्रक्रिया अविरत सुरू राहणार आहे.