अभिनेत्री भाग्यश्रीने आदित्यराजेंना डावलून गणपतीची आरती केल्याने वाद, वडील-मुलीत मतभेद
सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानमध्ये गणपती उत्सवाच्या वेळी उत्तराधिकारी पदावरून वाद निर्माण झाला आहे. अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांनी दत्तक पुत्र राजकुमार आदित्य राजे यांना डावलत आरती केली. विजयसिंह राजे पटवर्धन यांनी आदित्यराजे हेच उत्तराधिकारी असल्याचे सांगितले. भाग्यश्री यांनी आरतीच्या प्रश्नावर बोलणे टाळले. विजयसिंह राजे आणि राजलक्ष्मी राजे यांनी भाग्यश्रीच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली.