ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.