अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप
सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्या प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा आणि २० हजारांचा दंड ठोठावला आहे. इतर दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१६ मध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी आता पनवेल सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे.