“आज प्रवास टाळा, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा”; देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
मुंबईसह राज्यभरात तुफान पावसामुळे सखल भागांत पाणी साठले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुना मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन देत जनतेला घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने वर्क फ्रॉम होमची विनंती केली आहे. महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहेत. प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.