“अजितदादांशिवाय कोणत्याही गोष्टी…”, मतदानानंतर सुनेत्रा पवार भावूक; बारामती-राहुरीत मतदान!
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभेसाठी मतदान होत असताना, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांसाठीही आज मतदान पार पडत आहे. बारामतीत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानानंतर अजित पवार यांच्या आठवणींनी भावुक प्रतिक्रिया दिली. त्यांनी बारामतीकरांनी मोठ्या संख्येने मतदान करून अजित पवारांच्या योगदानाची परतफेड केली असल्याचे सांगितले.