बीडमध्ये धक्कादायक निकाल; मस्साजोग सरपंचपदाच्या निवडणुकीत संतोष देशमुखांच्या पत्नी पराभूत
बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख निवडणुकीत उतरल्या होत्या. भावनिक वातावरणामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी ९२ मतांनी विजय मिळवला. अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला असून, संतोष देशमुख यांच्या मुलांनी आईच्या प्रचारात भाग घेतला होता.