“नाशिकमध्ये मंगळवारी ढगफुटीसह ३०० मिमी पावसाची शक्यता” मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?
राज्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तयारीचा आढावा घेतला आहे. नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता असून, ३०० एमएम पाऊस होऊ शकतो. पालघर, रायगड, महाबळेश्वर, लोणावळा येथेही अतिवृष्टी झाली आहे. मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे हायवेवर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.