‘रस्ते आणि पूल बांधले म्हणजे शहरं उभी राहात नाहीत’; राज ठाकरे यांचं वक्तव्य नेमकं काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना मुंबईतील पावसामुळे होणाऱ्या तुंबण्यावर आणि वाहतूक कोंडीवर टीका केली. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर शहरांच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. रस्ते आणि पूल बांधून शहरं उभी राहत नाहीत, टाऊन प्लानिंग आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात आणि देशात घाणेरडं राजकारण सुरू असून, याचा फटका भविष्यात भाजपालाही बसेल, असंही त्यांनी म्हटलं.