देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “गाय जनावर नाही, तिला आईचा दर्जा”
राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा समारोप नागपूरमध्ये झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायीला आईचा दर्जा दिला असून गोमातेचं संवर्धन काळाची गरज असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर गोवंशाचा सकारात्मक प्रभाव असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशी गायींच्या संवर्धनाने शेतीची स्थिती सुधारू शकते. गो आधारित अर्थव्यवस्था तयार केल्यास मोठं परिवर्तन घडवता येईल, असंही फडणवीस म्हणाले.