“ओसाड गावाची पाटिलकी सोडतो हे म्हणणं कितपत योग्य?”; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
१९ जून रोजी शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी पक्ष प्रमुख पद सोडण्याबाबत विधान केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी करत, शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा विचार असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिवंत असल्याचं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करत, आत्मचिंतनाची गरज असल्याचं सांगितलं.