“दाऊद तर माझ्यासमोर बच्चा होता”; १९९३ च्या मुलाखतीत हाजी मस्तानने काय म्हटलं होतं?
मुंबईतील कुख्यात डॉन हाजी मस्तान याने १९९३ मध्ये ANI ला दिलेल्या मुलाखतीत अंडरवर्ल्ड अस्तित्वात नसल्याचे सांगितले. त्याने दाऊद इब्राहिमला बच्चा म्हटले आणि आपले राजकीय पक्ष स्थापन करण्याचे कारण स्पष्ट केलं होतं. हाजी मस्तानने अल्पसंख्याकांच्या समस्यांवर भाष्य केलं होतं आणि भारतातील कायदा-सुव्यवस्थेवर टीका केली. त्याने भ्रष्टाचारविरोधी कायद्याची मागणी केली आणि गरीबांच्या हितासाठी काम करण्याचे आश्वासन दिलं होतं. ही मुलाखत रिपोस्ट करण्यात आली आहे.