Video:मराठीवरून फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर; महाराष्ट्र दिनी मांडली स्पष्ट भूमिका
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकवण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे. राज ठाकरे यांनी मराठी शिकण्याच्या मुद्द्यावर टीका केली होती. फडणवीस यांनी मराठीचा अभिमान असावा, पण भाषेच्या आधारावर हिंसा मान्य नाही असं सांगितलं. महाराष्ट्र दिनानिमित्त जगभरातील मराठी बांधवांना आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.