लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना अपात्र ठरवलं का? देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सुरक्षा आणि लाडकी बहीण योजना या दोन मुद्द्यांवर त्यांची भूमिका मांडली. लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना वगळल्याची बातमी समोर आली आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी सगळी आकडेवारी सांगितली आहे.