‘पार्थ पवार कृतघ्न, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर झालेला खासदार’; काँग्रेसने सुनावले खडे बोल
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर महाराष्ट्र काँग्रेसने प्रत्युत्तर देत पार्थ पवार यांना टोले लगावले. पार्थ पवार म्हणाले की काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे आणि याचा महाराष्ट्रात परिणाम होईल. या टीकेवरुन काँग्रेसने पोस्ट लिहून पार्थ पवारांवर जोरदार टीका केली आहे. पार्थ पवारांचा उल्लेख कृतघ्न असा केला आहे.