ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चात ‘गब्बर’ची एंट्री, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबईत ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा आयोजित करण्यात आला होता. निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप घेण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली. मनसे कार्यकर्ता मनोज निर्मळ गब्बरच्या वेशात सहभागी झाला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार आणि भाजपावर जोरदार टीका केली. राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त केली.