सिया गोयल आणि चेतनने गुपचूप लग्न उरकलं होतं? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण राज्यभरात गाजलं. केतनची होणारी पत्नी सिया गोयलने त्याला लोहगडावरून ढकलून हत्या केली. सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीला अटक झाली आहे. पोलिसांनी ५ हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. तपासात सिया आणि चेतनने राजस्थानमध्ये गुपचूप लग्न केल्याचा संशय आहे. केतनच्या कुटुंबाला सियाच्या उत्तरांवरून संशय आला आणि प्रकरण उघडकीस आलं.