“अजितदादांना जाऊन सात महिने, VSR ला कोण वाचवतंय? पुरावे देणार”; रोहित पवारांची पोस्ट
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आज सात महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर विमान उतरत असताना अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या मृत्यूनंतर रोहित पवार यांनी सातत्याने तपासाची मागणी केली आहे. VSR कंपनीबाबत ४ सप्टेंबरला पुराव्यांसकट खुलासा करणार असल्याचे रोहित पवार यांनी जाहीर केले आहे.