कुणाल कामराचं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर, “लवकरच मुंबईत…”
कॉमेडियन कुणाल कामरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह गाणं गाऊन चर्चेत आला होता, आता त्याच्या पोस्टची पुन्हा चर्चा होते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामराच्या टीकेला दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर कामराने फडणवीसांना टॅग करत, "माझी औकात नसेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा," असं म्हटलं आहे. कामरा लवकरच महाराष्ट्रात शो घेणार असल्याचंही त्याने जाहीर केलं आहे.