“माझ्या मुलाला या प्रकरणात गोवलं जातंय, त्या मुलीला..”; चेतन चौधरीचे वडील काय म्हणाले?
केतन अग्रवाल या २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूची चर्चा राज्यभरात आहे. केतनला त्याच्या होणाऱ्या बायकोने, सिया गोयलने धक्का दिला आणि चेतन चौधरीने तिला साथ दिली असा आरोप आहे. चेतनचे वडील बाबूलाल चौधरी यांनी चेतन निर्दोष असल्याचे सांगितले. चेतन लोहगडावर केतन आणि सियाजवळ उभा होता, पण त्याने काहीही केले नाही असे बाबूलाल म्हणाले. चेतन निर्दोष आहे आणि त्याला सोडले पाहिजे असेही त्यांनी म्हटले.