“सुबुद्धी येवो आणि कुबुद्धीचं विसर्जन होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना”-देवेंद्र फडणवीस
मुंबई, पुण्यासह राज्यभरात अनंत चतुर्दशीचा सोहळा आणि मिरवणुका पार पडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटी येथे पाहणी केली. फडणवीस यांनी गणेशभक्तांचा उत्साह आणि मुंबई पोलिसांच्या नियोजनाचे कौतुक केले. त्यांनी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भक्तांना सुरक्षेने सहभागी होण्याचे आवाहन केले. विरोधकांबाबत विचारले असता, सुबुद्धी यावी आणि कुबुद्धीचे विसर्जन व्हावे अशी प्रार्थना केली.