Video: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, सुप्रिया सुळेंही अडकल्या; व्हिडीओ…
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक कोंडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अडकल्या आहेत. त्यांनी गाडीतूनच एक व्हिडीओ रेकॉर्ड करून घाटातील कोंडीची स्थिती दाखवली. मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या दिवशीच खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. सुळे यांनी सरकारला या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली आहे, कारण ही रोजचीच अडचण आहे.