“अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी वर्षभराने आणखी मुदत मागू नये” -प्रताप सरनाईक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे. आधी ही मुदत १०५ दिवसांची होती, परंतु अमराठी चालकांच्या विनंतीनुसार ती वाढवण्यात आली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले की, अमराठी चालकांना जुजबी मराठी बोलता यावी यासाठी हे अभियान सुरु आहे आणि वर्षभरात मराठी शिकणे आवश्यक आहे.