मोहन भागवत यांचं वक्तव्य; “जेन झीने आंदोलन केलं म्हणजे ते ‘अँटी नॅशनल’ ठरत नाहीत”
दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरले. CJP चे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलन संपले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन झींच्या आंदोलनाचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, आंदोलन हा संवादाचा एक प्रकार आहे आणि ते देशविरोधी नाही. आंदोलनाचे उद्दिष्ट योग्य असावे आणि ते विभाजनासाठी नसावे, असे भागवत म्हणाले.