“सुतकी पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा होतोय”, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत; जनतेला आवाहन!
महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही श्रद्धांजली वाहून महाराष्ट्र दिनाबाबत सरकारच्या अनास्थेवर टीका केली. त्यांनी हुतात्मा स्मारकाची अवस्था आणि मराठी जनांची अनास्था याबाबत खंत व्यक्त केली. राज ठाकरेंनी मराठी माणसांना संयुक्त महाराष्ट्राचा लढा विसरू नका, असे आवाहन केले.