“वीर सावरकरांच्या महाराष्ट्रात जातींवरुन डोकी फोडली जात आहेत”; राज ठाकरेंची पोस्ट काय?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४३व्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी सावरकरांच्या नावाचा वापर करून महाराष्ट्रात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. सावरकरांना एका व्यक्तीचा उदोउदो मान्य नव्हता आणि प्रत्येक गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर तपासून पाहावी असे त्यांचे मत होते. सावरकरांच्या प्रतिमा वापरून धर्मांमध्ये तेढ पसरवणाऱ्यांवर त्यांनी टीका केली आहे.