कुणाल चांदगुडेसाठी बहिणीची भावनिक पोस्ट, “तुझे सगळे प्रॉमिसेस…”
छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून कुणाल चांदगुडे या तरुणाने आत्महत्या केली. त्याला वाचवताना त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडेही खाली पडले. या घटनेने महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होते आहे. रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी, कुणालच्या मावस बहिणीने एक भावनिक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला आहे. २१ ऑगस्टला घडलेल्या या घटनेने चांदगुडे कुटुंबाचा अंत झाला.