“शरद पवार यांना कफाचा त्रास आणि श्वसन मार्गाचा संसर्ग”; डॉक्टरांनी काय सांगितलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधून प्रकृती सुधारल्यानंतर बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत परतल्यावर नियमित तपासण्यांसाठी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना खोकला, कफ आणि श्वसनमार्गाचा संसर्ग असून उपचार सुरू आहेत अशी माहिती डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली आहे.