शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, “कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही…”
शरद पवार यांनी मुंबईत संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचं प्रकाशन केलं. या कार्यक्रमाला जावेद अख्तर, साकेत गोखले, उद्धव ठाकरे उपस्थित होते. पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पुस्तकाबाबतच्या वक्तव्यावर टोला लगावला. त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करत पुस्तकातील माहिती सत्तेचा गैरवापर कसा होतो हे दाखवते असं सांगितलं. तसेच संजय राऊत, अनिल देशमुख यांच्या अटकप्रकरणीही भाष्य केलं.