“व्हीप बजावलाय, आता तातडीने कारवाई सुरू”, ठाकरे गटाचा बंडखोरांना इशारा; दिल्लीत काय घडतंय?
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बुधवारी पडलेली फूट महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. ठाकरेंचे ६ खासदार फुटल्याचे दावे होत असताना, दोन खासदारांनी अद्याप लोकसभा अध्यक्षांना पत्रावर सह्या केल्या नसल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांना तातडीने कारवाईचा इशारा दिला आहे.