पोस्टमधून तुकाराम मुंढेंचा संताप; “पाकिटावरचं लेबल खोटं बोलतं तेव्हा त्याची किंमत…”
नवी मुंबईत अन्नपदार्थांच्या पाकिटांवरील मुदत संपल्याची तारीख बदलण्याचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. मॅगी, लेज यांसारख्या ब्रँड्सचा साठा जप्त करण्यात आला. मुंढे यांनी पोस्टद्वारे ग्राहकांच्या विश्वासघातावर संताप व्यक्त केला. २४ ते २९ ऑगस्ट दरम्यान ही कारवाई झाली, ज्यात उत्पादन तारीख आणि घटक बदलले जात होते.