“सहा खासदार मिंधे सेनेत जाणं हे ‘ऑपरेशन देवेंद्र’ तर नाही ना?”; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटल्यानंतर, उद्धव ठाकरे त्यांच्या मतदारसंघांमध्ये सभा घेत आहेत. हिंगोलीत त्यांनी नागेश पाटील आष्टीकर यांना गद्दारांचा सरदार म्हटले. त्यांनी ऑपरेशन टायगर ऐवजी हे ऑपरेशन देवेंद्र असू शकते अशी शंका उपस्थित केली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिंधे सेना म्हणत टोलेबाजी केली. शिवसेना संपवू शकत नाही असे सांगत, त्यांनी भाजपावर आणि अमित शाह यांच्यावर आरोप केले.