“अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता”-राऊत
पुण्यात डीजेबंदीविरोधात विद्यानंद बापट यांनी आवाज उठवला आहे. डीजे आणि लाऊड स्पीकर बंद झाले पाहिजेत कारण त्याचा लोकांना त्रास होतो, असे त्यांचे म्हणणे आहे. संजय राऊत यांनीही बापट यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीवर उत्तरेचं अतिक्रमण होऊ नये असे सांगितले. तसेच, दहीहंडीच्या व्यासपीठावर हिडिस नृत्य होण्यावर फडणवीसांनी लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.