दिशा सालियन मृत्यू प्रकरण नेमकं काय? ८ जून २०२० ला काय घडलं होतं?
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिचा ८ जून २०२० रोजी गॅलरीतून पडून मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली होती, परंतु नंतर अनेक आरोप झाले. नारायण राणे यांनी बलात्कार आणि हत्येचे आरोप केले. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हे आरोप फेटाळले. आता सीबीआयने या प्रकरणात चार्जशीट दाखल केली असून, यात आदित्य ठाकरे यांचे नाव असल्याचे दिशाचे वकील निलेश ओझा यांनी सांगितले.