महाराष्ट्रातलं पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमकं काय? २० वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
महाराष्ट्रातील पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल पुन्हा लांबणीवर गेला आहे. २० वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, आजही अंतिम निकाल लागला नाही. पुढील सुनावणी २० जूनला होणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. सीबीआयने या हत्येचा तपास केला असून, राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचा आरोप आहे.